आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत वाहतूक पोलिस कॉॅन्स्टेबलची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; घटना CCTVमध्ये कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सांगली शहरात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. विश्रामबागमधील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्नाजवळ ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

 

मानटे यांच्या हत्येची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकासह चार कामगारांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, समाधान मानटे (30) असे हत्या करण्‍यात आलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. मानटे हे मिरज वाहतूक शाखेत कार्यरत होते.

 

मिळालेली माहिती अशी की, समाधान मानटे हे मंगळवारी रात्री ड्यूटी झाल्यानंतर रत्ना हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्‍यासाठी केले होते. हॉटेलबाहेर त्यांचा दोन जणांसोबत क्षुल्लक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर दोघांपैकी एकाने धारदार शस्त्राने मानटे यांच्यावर तब्बल 18 वार केले. मानटे यांचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...