आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकने घेतला पेट, चालक थोडक्यात बचावला Truck Fire On Mumbai Pune Express Highway Near Lonavala

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकने घेतला पेट, चालक थोडक्यात बचावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी 7 वाजेच्या सुमारास लोणावळा परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच देवदूत टीम आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने लोणावळा परिसरात अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक थांबवला आणि खाली उडी घेतली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.

 

ट्रकमध्ये केमिकल आणि प्लास्टिक, आणि बांधकाम साहित्य असल्यामुळे आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. रस्त्यावरील ट्रक बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्‍यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...