आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात दोन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात; सुधन्वा गोंधळेकर क्रांतीदिनालाच ATSच्या ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नालासोपारा स्फोटक साठाप्रकरणी एटीएसने शनिवारी पुण्यातील महेश इदलकर आणि विशाल खुटवड या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघांकडेही एटीएसने सविस्तर चौकशी केली. महेश इदलकर आणि विशाल खुटवड हे पुण्यातील रहिवासी असून एका हिंदुत्ववादी संघटनेशी ते निगडित आहेत.

 

एकाचे शिक्षण बारावीपर्यंत तर दुसऱ्याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून सध्या ते बेरोजगार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सनातन संस्थेचे पदाधिकारी पराग गोखले यांनी सुधन्वा गोंधळेकर, महेश इदलकर आणि विशाल खुटवड यांचा सनातन संस्थेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून त्यांच्याबाबत कोणतीच माहिती आम्हाला नसल्याचा खुलासा केला आहे.

 

सुधन्वा गोंधळेकर याचे कुटुंबीय सातारा येथे राहत असून गेल्या तीन वर्षापासून तो पुण्यात आठवडयातील काही दिवस रहाण्यासाठी येत होता. पर्वती पायथा येथील एका बंगल्यात त्याने भाड्याने खोली घेतली होती, तर पर्वती पायथा जवळील बँक ऑफ महाराष्ट्र परिसरात त्याने इंटरेअर डिझार्इनचे एक दुकान सुरू केले होते. पुणे, सातारा, सोलापूर येथे आगामी काही दिवसात घातपात घडविण्याचा त्यांचा कट असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...