आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून वडिलांनी राहत्या घरात घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ताथवडे परिसरातील नृसिंह काॅलनी येथील एका कुटुंबातील १० अाणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा खून करून वडिलांनी राहत्या घरी गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजता उघडकीस आली. शुभम दीपक बरमन (१०) अाणि रूपम दीपक बरमन (८) अशी खून झालेल्या मुलांची नाव अाहेत, तर दीपक बरमन (३५, रा. ताथवडे, पुणे) असे अात्महत्या केलेल्या वडिलांचे नाव अाहे. दरम्यान, दीपक यांनी आत्महत्या आणि मुलांची हत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत.


बरमन कुटुंबीय मूळ पश्चिम बंगालचे रहिवासी असून कामानिमित्त गेल्या १५ वर्षांपासून ताथवडे येथे राहण्यास अालेले अाहे. दीपक हा घराशेजारी खासगी कंपनीत काम करत हाेता, तर त्याची पत्नी ही एका खासगी कंपनीत मजुरीचे काम करते. त्यांची मुले शुभम हा चाैथीत, तर रूपम हा तिसरीत शिक्षण घेत हाेता. शनिवारी शाळेला सुची असल्याने दाेन्ही मुले घरीच हाेती. त्यांचे अार्इ-वडील हे कामासाठी कंपनीत गेले हाेते. दुपारी वडील दीपक हे घरी अाले व त्यांनी दाेन्ही मुलांचा दाेरीने गळा अावळून खून केला. त्यानंतर दीपक यांनीही फॅनच्या हुकला दाेरीच्या सहााय्याने गळफास घेत अात्महत्या केली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दीपक यांची पत्नी जेवणासाठी घरी अाली असता घराचा दरवाजा कुणीही उघडत नव्हते. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना बाेलावले. त्यानंतर घराचा दरवाजा ताेडला असता दीपक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर दाेन्ही मुलांचे गळा आवळलेले मृतदेह आढळले. दरम्यान, दीपक यांनी आत्महत्या आणि मुलांची हत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, बरमन हे ज्या कंपनीत काम करत होते, तिथे त्यांना काही ताण होता का ? याचाही पोलिस तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...