आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलटणमध्ये पालखी स्थळावर शॉक लागून दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- फलटण येथे पालखी स्थळावर दोन वारकऱ्यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. पालखी स्थळावरुन ट्रक पंढरपूरच्या दिशेने जात असताना आज (16 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. तिघांचा लोंबकलत असलेल्या तारेला स्पर्श झाला.

 

मृतांमध्ये ज्ञानोबा माधवराव चोपडे (वय- 65) आणि जाईबाई महादू जामके (वय-वर्षे) अशी मृतांची नावे  आहेत. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कमलाबाई गोविंद लोखंडे (वय- 65) या जखमी झाल्या आहेत. ज्ञानोबा हे परभणी जिल्ह्यातील समतापूरचे रहिवाशी होते, तर जाईबाई या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रहिवाशी होते.

 

अन्नदान करायला आलेल्या महिलेचा  टँकरखाली  चिरडून  मृत्यू
-अन्नदान करायला आलेल्या महिलेचा टँकरखाली चिरडून काल रविवारी मृत्यू झाला होता. कविता विशाल तोष्णीवाल (42) यांना पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर येथील विशाल तोष्णीवाल आणि त्यांचे कुंटुबीय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि अन्नदान करण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते.

बातम्या आणखी आहेत...