आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता वाटपापेक्षा निकाल वेळेत लावा, सावळा गोंधळावरून लक्ष हटवण्यासाठीच तावडेंचा उपक्रम- उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाविद्यालयांमध्ये गीतावाटप करण्यापेक्षा विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागतील, इकडे लक्ष द्या, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात तावडे यांना टोला मारला. विद्यापीठात सुरू असलेला सावळा गोंधळावरून लक्ष हटवण्यासाठीच तावडे यांनी गीतावाटपाचा उपक्रम सुरू केल्याची टीकाही त्यांनी केली.

 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांच्या प्रतिनिधींची व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी पुण्यात आले होते. येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ‘नाणार प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे. नाणार आणि समृद्धी प्रकल्पांची गल्लत करू नका, असेही ते मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

 

नोटाबंदीइतके मंदिर सोपे नाही
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच 2019 मध्ये राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करणार असल्याचे वक्तव्य केले. त्यावर प्रश्न विचारला असता ठाकरे यांनी राम मंदिर उभारणे हे नोटाबंदीचा निर्णय घेण्याइतरे सोपे नाही. नोटाबंदीचा निर्णय अल्पावधीत घेतला गेला होता, पण वर्षानुवर्षे जो प्रश्न वादग्रस्त आहे, त्यावर असा तडकाफडकी निर्णय सोपा नाही.

 

युतीबाबात अद्याप निर्णय नाही
आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढवणार का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ‘युतीचा निर्णय एक व्यक्ती ठरवत नाही. तो पक्षाचा सामूहिक निर्णय असतो. अद्याप तशी चर्चा नसल्याने युतीबाबतचा निर्णय झालेला नाही. योग्य वेळी तो घेतला जाईल,’

बातम्या आणखी आहेत...