आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकोबांच्या पालखीरथासाठी हौशा-गवशाची निवड; चौघड्याच्या गाडीचा भार गिरीश-राजा वाहणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ औढण्याचा मान यंदा प्रणव शेळके (माण गाव, तालुका मुळशी) यांच्या हौशा आणि गवशा नावाच्या उमद्या बैलजोडीला मिळाला आहे. तसेच चौघड्याच्या गाडीचा भार वाहण्याची संधी अमोल काळोखे (विठ्ठलनगर, देहू गाव) यांच्या गिरीश आणि राजा या बैलजोडीला मिळाली आहे.

 

पालखी रथाचा भार सक्षमपणे पेलू शकेल अशा ताकदवान, डौलदार, उमद्या बैलजोडीचा निवड संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बैलजोडी निवडण्यासाठी वय, रंग, वजन, शिंगे, वशिंड, शेपूट, खूर, चाल यांची पाहणी केली जाते. बैलांचा स्वभाव आणि आपसातील ताळमेळही लक्षात घेतला जातो. आक्रमक, चिडक्या स्वभावाचे बैल निवडले जात नाहीत. दोन्ही जोड्या कर्नाटकमधून खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यांची वये अनुक्रमे ४ आणि ६ वर्षांची आहेत. दोन्ही जोड्यांची शिंगे अर्धचंद्राकृती आकाराची आहेत. हौशा-गवशा जोडी पांढऱ्याशुभ्र रंगाची आहे, तर गिरीश-राजा जोडी तपकिरी पांढऱ्या रंगाची आहे, असे प्रणव शेळके आणि अमोल काळोखे यांनी सांगितले.  

 

सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात 
तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सोहळाप्रमुख अभिजित आणि सुनील मोरे यांनी दिली. यंदा तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे 333 वे वर्ष आहे. चार दिवसांनी दिंड्यांचे आगमन देहूमध्ये होण्यास प्रारंभ होईल. यंदा सोहळ्यात 331 दिंड्यांचा सहभाग असेल, असेही मोरे म्हणाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. हौशा आणि गवशा नावाच्या उमद्या बैलजोडीचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...