आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- शनिवार वाडा म्हणजे पेशव्यांची राजधानीच. पहिल्या बाजीरावांच्या काळाताच तो बांधला गेला. पुढे हाच वाडा पेशव्यांच्या यशाचा आणि र्हासाचा साक्षीदार बनला. बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यात पुण्यातील शनिवार वाडा दाखवण्यात आला होता. शनिवार वाडा कसा बांधला, याविषयी आम्ही आपल्यासाठी रंजक माहिती घेऊन आलो आहे.
कोण होता पहिला बाजीराव
पहिला बाजीराव पेशव्याचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये तर मृत्यू 28 एप्रिल 1740 मध्ये मृत्यू. त्यांना अवघे 40 वर्षे आयुष्य मिळाले. पण, या 40 वर्षांत त्यांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतातही विस्तारल्या. वेगवान हालचाल हा त्यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
कसा बांधला शनिवार वाडा?
शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, बाजीरावाने त्या ठिकाणी एका सस्याला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधूून घेतला हाच तो शनिवारवाडा. शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1830 रोजी सुरू झाले, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली.
1732 नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास 1760 हे वर्ष उजाडले. 1808, 1821, 1813 या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर 17 नोव्हेंबर 1817 ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेन्री डंडास रॉबर्टसन राहत होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शनिवारवाड्याचे दुर्मिळ फोटोज आणि जाणून घ्या बाजीराव पेशवे शनिवार वाड्याविषयी माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.