आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Women day Special: नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांची 13 हजार फूट उंचावरून जम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आज (8 मार्च) जागतिक महिला दिन. यानिमित्ताना आम्ही आपल्यासाठी मूळच्या जळगाव जिल्ह्यातील एका साहसी तरुणीची माहिती घेऊन आलो आहोत. ही तरुणी म्हणजे भारतीय स्काय डायव्हर आणि पद्मश्री शीतल महाजन.

 

शीतल यांनी नुकताच थायलंडमध्ये नऊवारी साडी नेसून 13 हजार फूट उंचावरून विमानातून पॅरा जम्प करून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवत विश्वविक्रम प्रस्थापित केला.

 

पॅरा जंपर साहसी खेळात उत्तुंग भरारी घेत पद्मश्री शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळात 17 राष्ट्रीय व 6 जागतिक विक्रम करून भारतीय पहिला महिला असल्याचा मान मिळविला आहे. महाराष्ट्राची शान असलेली शीतल महाजन यावेळी मराठी असल्याचा सार्थ अभिमान मनामध्ये घेऊन आपल्या मराठी संस्कृतीचे जतन राहावे. तसेच मराठी बाणा कायम रहावा याकरिता आता पर्यंत जगामध्ये कुणीच असा धाडस केला नसल्याने पहिल्यांदाच महाराष्ट्राची संस्कृती महिलांची नऊवारी साडीचा पेहराव म्हणजे चक्क नऊवारी साडी नेसून विमानातून जम्प केली.

 

शीतल महाजन बहिणाबाई चौधरी यांची पणती
शीतल महाजन यांचा जन्म पुण्यात झाला असून त्या मूळचे गाव जळगाव आहे. आद्य कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या त्या पणती आहेत. बहिणाबाई चौधरीचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या. बालपणापासूनच शीतलला काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता. यातच तिला पॅराशूट जम्पिंगची आवड निर्माण झाली. 2004 पासून ह्या स्कायडायव्हिंग (पॅराशुट जंम्पिग) या खेळात जागतिक स्पर्धेत आणि जागतिक विक्रमामध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शीतल महाजन यांचा 13 हजार फुटावरील स्काय डायव्हींगचा व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...