आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Suicide: लग्नाचा श्रृंगार करून विवाहितेची आत्महत्या; होत नव्हते मूलबाळ, नैराश्यातून उचलले पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लग्नाचा श्रृंगार..हातावर मेंदी, कपाळावर बिंदी, अंगावर सोन्याचे दागिने असा पेहराव करून कुणी एका विवाहितेने पुण्यात आत्महत्या केली आहे. हृदय पिळवून टाकणारी ही घटना घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. विद्या शैलेश पारधी (वय-24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विद्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. 'पतीने दुसरा विवाह करावा पण तिला त्रास देऊ नये', असा उल्लेख केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विद्या पारधी हिचे तीन वर्षांपूर्वी शैलेशशी प्रेमविवाह झाला होता. या लग्नाने विद्याचे आई-वडील प्रचंड दुखावले होते. विद्या आई होणार नाही, असे तिला डॉक्टरांनी सांगितले होते. यामुळे ती मागील काही दिवसांपासून नैराश्यात  होती. ही बाब तिने पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शैलेशने तिला समजून न घेता मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी या त्रासाला कंटाळून विद्या तिच्या मैत्रिणीकडे राहात होती. शनिवारी (ता.7) विद्या पतीकडे आली तेव्हा घरी कुणीही नव्हते. विद्याने लग्नाचा श्रृंगार केला. अंगावर सोन्याचे दागिने चढवले. शालू नेसला. हातावर मेंदी तर कपाळावर बिंदी लावली आणि आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली.  घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिस घटनास्थळी पोहोचले. विद्याला पाहून तेही थक्क झाले.

 

आत्महत्येपूर्वी लिहिली होती चिट्ठी...
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत विद्याने लिहिले आहे की, 'आई-बाबा मला माफ करा.शैलेश तुम्ही दुसरा विवाह करा. मात्र, तिला मानसिक व शारिरीक त्रास देऊ नका,माझं नशीबच खराब असल्याने मी आत्महत्या करत आहे.'

 

 

बातम्या आणखी आहेत...