आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर चालवण्यासाठी \'ती\' उचलते रेल्वे ट्रॅकवरील मृतदेह...मिळतात केवळ 150 रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- आज जागतिक महिला दिन छोट्या क्षेत्रापासून ते मोठमोठ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याचा दिवस. अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळते की, अपघात झाल्यानंतर बरेच तरुण बघ्याची भूमिका घेऊन तो प्रसंग आपल्या मोबाइलमध्ये टिपण्यात दंग असतात. जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढवतो. मात्र, पिंपरी रेल्वे स्थानकात एक डॅशिंग महिला आहे. ती महिला रेल्वे अपघातात जखमींना मदत करते. वेळ प्रसंगी रेल्वे ट्रॅकवरून मृतदेह उचलते. हे काम त्या मागील 9 वर्षांपासून करत आहेत.

 

या डॅशिंग महिलेचे नाव शिवानी गणेश नाशे असे आहे. त्या काळेवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. गरीबीने ग्रासलेल्या असल्याने मिळेल ते काम करण्याची तयारी शिवानी यांची आहे. त्यांचा प्रवास देखील तसा खडतर लग्न झाल्यानंतर त्या सासरी नांदत होत्या, त्यावेळी त्यांनी 40 हजार रुपयांचा कर्ज घेतल होते. त्यावेळी त्यांना चिकन गुनिया हा आजार झाला.आजारी असल्याने कर्ज फेडता येत नव्हते, कर्ज फेडण्यावरून अनेक वेळा पतीशी भांडण झाले,मात्र पती मदत करत नसल्याने अखेर दोघे जण विभक्त झाले. 40 हजार रुपयांचा कर्जाचा डोंगर कसाबसा मिळेल ते काम करून सर केला.त्यानंतर पिंपरीतील रेल्वे स्थानकात कंत्राट पद्धतीने झाडू मारण्याचे काम मिळाले,त्यावेळी महिन्याला साडेचार हजार रुपये पगार मिळाला तोच वाढून आता साडेपाचपर्यंत पोहचला आहे.

 

एवढ्यावर घर चालत नसल्याने त्यांनी रेल्वे अपघातातील मृतदेह उचलण्यास सुरुवात केली.तरुणांना लाजवेल असे काम त्यांनी करून दाखविले, रेल्वे अपघातात अनेक वेळा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह असतात मात्र या डॅशिंग महिलेने माघार घेतली नाही,कारण प्रश्न होता रोजी रोटीचा. न घाबरता मृतदेह उचलले. 9 वर्षांत काळात शिवानी यांनी तब्बल 400 च्या वर मृतदेह उचलले आहेत. त्यांचे काम एवढ्यावरच न थांबता त्या शवगृहात मृतदेह घेऊन जातात.त्यांना याची कसलीच भीती वाटत नाही. अनेक वेळा तरुण किंवा रेल्वे कर्मचारी मृतदेह उचलण्यास धजत नाहीत. मात्र शिवानी या पुढे होऊन त्या काम करत आहेत.या बदल्यात मदत म्हणून त्यांना कधी 100 तर 150 रुपये मिळतात.ज्यामुळे त्यांच्या घरची रोजी रोटी चालते.भाड्याचे घर असल्याने त्यांना अडीच हजार रुपये हे घर मालकांना त्यावे लागतात,मात्र उरलेल्या पैशात तीन मुले आणि एका मुलीचे शिक्षण भागवत आहेत.चारही मुले ही बारामती येथील वसतिगृहात शिक्षण घेत आहेत. माझे शिक्षण हे केवळ इयत्ता दुसरी पर्यंत झाले आहे, माझ्यासारखी वेळ माझ्या मुलांवर येऊ नये यासाठी मुलांना शिक्षण देत असल्याचे शिवानी यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे त्यांची काबाड कष्ट करण्याची तयारी आहे.महिला दिनानिमित्त अश्या खऱ्या खुऱ्या डॅशिंग महिलेला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.!

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... रेल्वे ट्रॅकवर छिन्न विच्छिन्न झालेले मृतदेह उचलणार्‍या डॅशिंग महिलेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...