आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात फटाक्यांच्या स्फोटात गंभीर भाजलेल्या \'त्या\' तरुणाची प्राणज्योत मालवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- खेड तालुक्यातील कुरुळी येथील ग्रामदैवत यात्रेनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत एका 25 वर्षांचा तरुण गंभीररीत्या होरपळला होता. आज (शुक्रवार) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बल्या उर्फ रितेश डोंगरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

सूत्रांनुसार, गेल्या 8 एप्रिलला कुरुळी येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा होती. यात्रेनिमित्त गावात फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. फटाके उडवताना अचानक मोठा स्फोट होऊन त्यवात रितेश गंभीररित्या भाजला गेला. गावकर्‍यांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, अखेर शुक्रवारी सकाळी रितेशची प्राणज्योत मालवली.

 

ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रेत करण्‍यात आलेल्या आतशबाजीत झालेल्या स्फोटाचा व्हिडिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...