आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पर्यटक तरुण बुडाला, शोधकार्य सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लोणावळा येथे फिरायला आलेल्या युवकाचा भुशी धरणात बुडालयाची घटना घडली आहे. सुरेंद्र तुकाराम कदम (वय 24,ठाणे) अस बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा शोध सुरु आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कदम आपल्या भाऊ आणि 5 मित्रांसह ठाण्याहून लोणावळा फिरायला आला होता. भुशी डॅममध्ये सुरेंद्र पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. इतर मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत शिवदुर्ग रेस्क्यू टीमला दिली. टीमचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरु झाले सुरू आहे मात्र अद्याप सुरेंद्र आढळून आलेला नाही. शिवदुर्ग टीम चे  साहेबराव चव्हाण, राजु पवार, राजेश तेले, आनंद गावडे, सागर कुंभार, अजय शेलार, प्रणय अंभोरे, प्रविण देशमुख,वैष्णवी भांगरे, अभीजीत बोरकर, राहुल देशमुख, विकास मावकर, अनिल आंद्रे, राजु पाटील, अनिकेत आंबेकर, दिनेश पवार,अतुल लाड, मधूर मुंगसे, प्रविण ढोकळे, अशोक उंबरे,अमोल परचंड, सागर पडवळ, निकीत तेलंगे,रोहीत वर्तक, सुनिल गायकवाड हे बचावकार्य करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...