आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून बेडरुममध्ये बसवला छुपा कॅमेरा, पतीविरोधात गु्न्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी पतीने बेडरुममध्ये छुपा कॅमरा लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या हाती हा कॅमेरा लागताच तिने  पोलिसांत तक्रार दाखल केली. वानवडी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात वानवडी परिसरात राहणा-या एका दांपत्याचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून पती परदेशात नोकरीला होता. या दांपत्याला 12 वर्षांचा मुलगा आहे. परदेशातून परतल्यानंतर पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यावरून त्यांच्यात भांडणे होऊ लागली तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. आठ महिने ते एकत्र राहिले. पण त्यांच्यात वाद होऊ लागले. काही दिवसांनी तो त्याच्या बेंगळुरूतील घरी राहायला गेला. कधी-कधी तो मुलाला भेटण्यासाठी पुण्यात यायचा. यावेळी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याने पत्नीच्या नकळत बेडरुममध्ये कॅमेरा बसवला. हा कॅमेरा एके दिवशी तिच्या हाती लागला. हा प्रकार पाहून संतापलेल्या पत्नीने संशयी पतीविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, घटनेचा तपास करण्यात येत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...