आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी कंपनीत काम करणा-या तरुणीची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- हिंजवडीतील एका आयटी कंपनीत काम करणा-या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारुंजी येथे सोमवारी रात्री दहा वाजता घडली असून पोलिसांना याप्रकरणी तपास सुरु केला आहे. 

 

आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा नागनाथ वाघमारे (वय 23, मुळगाव - सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत काम करीत होती. तिने सोमवारी मारुंजी येथील राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत मारुंजी परिसरातील रहिवासी सुनील अंकुश जाधव यांनी हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. पूजाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 

बातम्या आणखी आहेत...