आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Koregaon-Bhima हिंसाचार: सुधीर ढवळेंसह इतर तिघांना 4 जुलैपर्यंत न्‍यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एल्गार परिषदेत नक्षलवादी हितसंबंध असल्यावरून पाेलिसांनी अटक केलेले रिपब्लिकन पँथरचे अध्यक्ष सुधीर ढवळे, नागपूर विद्यापीठातील प्राध्यापिका शाेमा सेन, महेश राऊत आणि राेना विल्सन यांना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली अाहे. या सर्व जणांची गुरुवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. 


पाेलिसांनी सरकारी वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले की, नागपूर येथे प्रा. शाेमा सेन, महेश राऊत यांच्या घरी, मुंबई येथे सुधीर ढवळे यांचे घर अाणि कार्यालय तसेच दिल्लीमध्ये राेना विल्सन यांच्या घरी पाेलिसांनी १७ एप्रिल राेजी छापे मारले हाेते. त्या वेळी पाेलिसांनी माेठ्या प्रमाणात वेगवेगळी कागदपत्रे, लॅपटाॅप, हार्डडिस्क, पेनड्राइव्ह जप्त केले. इलेक्ट्राॅनिक पुरावे हे फाॅरेन्सिक प्रयाेगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात अाले असून त्यापैकी काही गाेष्टींचे अहवाल अाले अाहेत. मात्र, काही अहवाल अजून येणे बाकी आहेत. त्यामुळे अाराेपींचा पाेलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत अाराेपींना न्यायालयीन काेठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. 

 

काय आहे प्रकरण?

पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर राेजी अायाेजित एल्गार परिषदेनंतर काेरेगाव भीमा या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दंगल उसळली होती. यात नक्षलवादी धागेदाेरे असल्याचे कागदाेपत्री पुरावे गाेळा करत 5 महिन्यांनंतर पुणे पोलिसांच्या 4 पथकांनी 6 जून रोजी एकाच वेळी नागपूर, मुंबई, दिल्लीत पहाटे छापे टाकत 5 जणांना अटक केली.

 

रिपब्लिकन पँथर्सचे कार्यकर्ते व एल्गार परिषदेचे अायाेजक सुधीर ढवळे यांना मुंबईतून, प्रा. शाेमा सेन व महेश राऊत यांना नागपुरात आणि माअाेवादी नेता राेना विल्सनला दिल्लीतून अटक करण्‍यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...