आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- कल्याणी देशपांडेच्या दिराला हायप्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणी अटक, परदेशी महिलेची सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झालेली कल्याणी देशपांडे सध्या येरवडा कारागृहात आहे मात्र तिचा हा व्यवसाय जेल मध्ये राहूनही सुरुच असल्याचे दिसते आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कल्याणीच्या दीराला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटप्रकरणी अटक केली असून त्याच्या तावडीतून उजबेकिस्तानच्या एका महिलेची सुटका केली आहे. 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीचा दीर निलेश देशपांडे हा दलालाकरवी परदेशी तरुणींना बोलावून सेक्स रॅकेट चालवत होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान निलेश देशपांडे जवळून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. हा मोबाईल तुरूंगात असणाऱ्या कल्याणी देशपांडेच्या नावावर आहे.

 

कोण आहे कल्याणी देशपांडे ?
पुणे शहरात संघटीतपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे (वय-46) हिच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील चतु:श्रृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलीस ठाण्यात तिच्यावर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. कल्याणीला दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली असून ती सध्या येरवडा जेलमध्ये आहे. 

बातम्या आणखी आहेत...