आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांजारभाट समाजात विना व्हर्जिनिटी टेस्ट झाले पहिले लग्न, यासाठी सुरू झाली होती ग्लोबल मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आपल्या देशातील काही समाजामध्ये आजही लग्नाच्या पहिल्या रात्रीच वधुची कौमार्य चाचणी (वर्जिनिटी टेस्ट) घेतली जाते. राज्यातील कंजारभाट समाजात आजही ही कुप्रथा सुरु असल्याचे सांगण्यात येते. कंजारभाट समाजातील व्हर्जिनिटी टेस्टविरोधात मोहीम सुरू करणारा विवेक तामचेकर यांनी आपल्याच समाजाच्या विरोधातील लढाईत विजय मिळवला आहे. विवेकने समाजातील व्हर्जिनिटी टेस्टची प्रथा मोडून काढत ही टेस्ट न करता लग्न केले आहे. 12 मेला विवेक विवाहबंधनात अडकला आहे. आपल्याच समाजातील ऐश्वर्या भाट नावाच्या तरूणीशी त्याचा विवाह झाला आहे. दोघेही कंजार भाट समाजातील आहेत, परंतु, त्यांचा व्हर्जिनिटी टेस्टला विरोध होता. कंजारभाट समाजात व्हर्जिनिटी टेस्ट करणे अनिवार्य आहे, या प्रथेविरोधात विवेक गेल्या सहा महिन्यांपासून लढत आहे.


व्हर्जिनिटी टेस्टविरोधात फेसबुकवरून सुरू केली मोहीम...
- विवेक तामयचिकरने आपल्या समाजाविरोधातील लढाईला ग्लोबल बनवले. व्हर्जिनिटी टेस्टविरोधात विवेकने 'स्टॉप द वी रिच्युअल' नावाचे फेसबुक पेज तयार केले होते. या पेजच्या माध्यमातून त्याने समाजातील अनिष्ठ प्रथांविषयी महिलांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला.
- विवेकने सुरू केलेले फेसबुक पेज केवळ सहा महिन्यात एक मोहीम बनले. समाजातील प्रत्येक घटकात याची चर्चा सुरू झाली. या प्रथेविरोधात आवाज उठवणाऱ्या विवेक आणि त्याच्या समर्थकांवर पिंपरीमध्ये हल्ला देखील झाला, परंतु, त्याने हार मानली नाही.
- विवेक म्हणतात की, समाजात जे काही चुकीचे आहे, ते सर्व संपले पाहिजे. मला माझे लग्न विना व्हर्जिनिटी टेस्टचे करायचे आहे. व्हर्जिनिटी टेस्ट अमाणूष आहे, असे माझे मत आहे. माझ्या लग्नापासून जर याची सुरूवात झाली आहे, तर पुढे चालून ही प्रथा पुर्णपणे संपून जाईल.


काय आहे व्हर्जिनिटी टेस्टची प्रथा...?
- कांजरभाट समाजात अशी प्रथा आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्री व्हर्जिनिटी टेस्ट घेण्यात येते. या टेस्टमध्ये तरूणी पास झाल्यानंतरच तिचे लग्न संबंधीत तरूणाशी लावून देण्यात येते. टेस्ट फेल झाल्यास तरूणीला सामाजातून बहिष्कृत करण्यात येते. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
- 'स्टॉप द व्ही रिच्युअल' मोहिम समाजाचा हाच विचार बदलण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. परंतु, कांजरभाट समाजाचा याला विरोध होता. गेल्या आढवड्यातच व्हर्जिनिटी टेस्टला विरोध करणाऱ्या एका जोडप्याची धुलाई करण्यात आली होती.
- अशात विवेकचे लग्न ऐश्वर्याशी झाले, ते ही कोणत्याही व्हर्जिनिटी टेस्टशिवाय, हे कंजारभाट समाजातील मोठ्या बदलाकडे पडलेले पहिले पाऊल आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि शिवसेनेने 'स्टॉप द व्ही रिच्युअल' मोहीमेचे समर्थन केले आहे.


कशी होते व्हर्जिनिटी टेस्ट...?
लग्नाच्या पहिल्या रात्री बाहेर उपस्थित असलेले लोक बेडशीट पाहून हे ठरवतात की या युवतीचे कौमार्य अबाधित होते की नाही. बेडशीटवर रक्ताचे डाग न आढळल्यास असे मानण्यात येते की या मुलीचे यापूर्वी कुणाशीतरी शरीरसंबंध झाले आहेत. अशा वेळी अनेकदा नववधूला मारहाणही होते. पण समाजातीलच काही युवकांनी आता या कुप्रथेला विरोध सुरु केला आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो....

बातम्या आणखी आहेत...