आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधींची जशी हत्या झाली तशा अात्मघातकी हल्ल्याची नक्षलींची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींना पोलिसांनी न्यायालयात आणले. - Divya Marathi
आरोपींना पोलिसांनी न्यायालयात आणले.

पुणे -  काेरेगाव भीमा प्रकरणात अटक केलेल्या पाच अाराेपींना गुरुवारी न्यायालयासमाेर हजर करून सरकारी पक्षाने त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा युक्तिवाद केला. इतकेच नव्हे तर ‘राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे देशात पुन्हा अात्मघातकी हल्ला करण्याच्या दृष्टीने नक्षलवादी नेते विचार करत अाहेत. तसेच माेठा शस्त्रसाठ्याचा पुरवठा करण्यात अाला अाहे,’ असा उल्लेख असलेले नक्षलवादी चळवळीतील बड्या नेत्याचे पत्र या अाराेपींकडील दस्तएेवजात पाेलिसांना सापडल्याचा गाैप्यस्फाेट सरकारी वकिलांनी गुरवारी पुण्याच्या न्यायालयात केला.     


सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितले की, अटक करण्यात अालेल्या अाराेपींच्या दस्तएेवजात एक नक्षलवादी पत्र मिळून अालेले अाहे. त्यात एम-४ हे शस्त्र पुरवण्याचे तसेच वार्षिक चार लाख राउंड पुरवठा करण्याचे सांगण्यात अाले अाहे. तसेच राजीव गांधी यांच्याप्रमाणे अात्मघातकी हल्ला पुन्हा करता येर्इल का, याबाबत वरिष्ठ नेते गांभीर्याने विचार करत असल्याचा उल्लेख त्यात अाहे. ३१ डिसेंबर २०१७ राेजी पुण्यात झालेल्या वादग्रस्त एल्गार परिषदेचे अायाेजक सुधीर ढवळे हे तीन ते चार महिन्यांपासून परिषदेची तयारी करत हाेते.

 

बंदी घालण्यात अालेली दहशतवादी संघटना सीपीअायच्या (एम) वरिष्ठ नेतृत्व अादेशानुसार ते ‘काेरेगाव भीमा शाैर्य दिन अभियान’ या बॅनरखाली काम करत हाेते. संशयित राेना विल्सन याचे घर झडतीत माअाेवाद्यांची पत्र मिळून अालेली असून त्यात नक्षलवादी भूमिगत नेते काॅ.मंगलू, काॅ.दिपू हे ढवळे यांच्या दाेन महिन्यांपासून संपर्कात असल्याचा उल्लेख अाहे.  जुलै- अाॅगस्ट २०१७ मध्ये दाेन टप्प्यात ढवळे अाणि शाेमा सेन यांना नक्षलवाद्यांनी अर्थसाह्य पुरवल्याचे त्यातून स्पष्ट हाेते. तसेच र्इस्टर्न रिजनल ब्युराेचे २३ व २४ डिसेंबरला माअाेवादी सीपीअायचे एक पत्र मिळालेले असून त्यात देशभरातील वेगवेगळ्या अांदाेलनकर्त्यांनी एकत्र येऊन शासन विराेधात व्यापक क्रांतिकारी अाघाडी तयार करावी, असे सूचित करण्यात अाल्याचा पुरावा मिळालेला अाहे, असा दावाही अॅड. पवार यांनी केला.

 

ढवळे यांना पाच लाख रुपये देण्याकरिता ‘पेसा’ कायद्यानुसार ग्रामपंचायत बैठकीत निधी मंजूर केल्याचे काॅ. प्रकाश यांनी काॅ. राेना यांना दिलेले पत्र ही मिळून अालेले अाहे. देशाची एकता भंग करण्याकरिता बुद्धिमान तरुणांना पक्षात समाविष्ट करून घ्या, असे अावाहनही त्यात करण्यात अाले अाहे. शाेमा सेन यांच्यावर अल्पसंख्याक समाज व जातीपातीत फूट पाडण्याची जबाबदारीही या पत्रान्वये साेपवण्यात अाली. 

 

अाराेपींचा परराज्यातील हिंसक कृत्यांशी संबंध    
सहपाेलिस अायुक्त रवींद्र कदम म्हणाले, राेना विल्सन, सुधीर ढवळे, शाेमा सेन, महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग या पाच जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे ठाेस पुरावे मिळाले अाहेत. एल्गार परिषदेच्या अायाेजनात माअाेवाद्यांचा पैसा हाेता. कबीर कला मंचाचे कार्यकर्ते केवळ फूट पिलर्स असून सध्या त्यांच्यावर कारवाई करण्यात अाली नाही. अटक केलेल्या अाराेपींचे छत्तीसगड, गडचिराेलीच्या हिंसक कृत्यांशी अप्रत्यक्ष संबंध आहेत.

 

गरज पडल्यास मेवाणी, उमरचीही चाैकशी हाेणार    
जिग्नेश मेवाणी, उमर खलीद यांना गरज पडल्यास चाैकशीसाठी बाेलावले जाईल. एल्गार परिषदेत त्यांनी दिलेल्या जहाल भाषणाची स्वतंत्र तपासणी हाेत अाहे. या परिषदेत सहभागी सर्वच संघटनाचा नक्षलवादाशी संबंध हाेता असे नाही.’ दरम्यान, तरुण, बुद्धिमान युवक यांना नक्षलवादी संघटनेकडे खेचण्याचा प्रयत्न करत असून तरुणांनी त्यास बळी पडू नये. शहरी नक्षलवाद देशाला धाेका असून नागरिकांनी वेळीच जागरूक हाेणे गरजेचे अाहे,’ असे अावाहन कदम यांनी केले.

 

कोण आहेत हे 5 जण ज्यांना पुणे पोलिसांनी केली अटक-

 

१) सुधीर ढवळे  : ज्येष्ठ दलित कार्यकर्ते व ‘विद्राेही’ या मराठी मासिकाचे संपादक. रिपब्लिकन पँथर या संघटनेची त्यांनी बांधणी केली. नक्षलवादी संबंधांवरून त्यांना यापूर्वी २०११ मध्ये अटक करण्यात अाली हाेती. मात्र मे २०१४ मध्ये गाेंदिया न्यायालयाने पुराव्यांअभावी त्यांची मुक्तता केली. पुणे येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेचे ते प्रमुख अायाेजक हाेते. 

 
२) राेना विल्सन  : मूळचे केरळचे रहिवासी असलेले विल्सन हे दिल्लीत राहतात. कमिटी फाॅर रिलीज अाॅफ पाॅलिटिकल प्रिझर्नस संघटनेचे ते सध्या सचिव अाहेत. बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक व अाफ्स्पा या कायद्यांविराेधातील अांदाेलनात त्यांचा सक्रिय सहभाग हाेता. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले दिल्लीतील प्रा. जी.एन.साईबाबा यांचे ते सहकारी अाहेत. प्रा. साईबाबा यांच्या अटकेनंतर विल्सन यांनी ग्रामीण अाणि शहरी डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांत समन्वयाची भूमिका ते पार पाडत अाहेत.   


३) सुरेंद्र गडलिंग  : नागपूर येथे रहिवासी गडलिंग वकील असून इंडियन असाेसिएशन अाॅफ पीपल्स लाॅयर्सचे सचिव अाहेत. नक्षलींशी संबंधांवरून ज्या अादिवासी व दलितांना अटक केली जाते त्यांचे वकीलपत्र गडलिंग घेतात. यामध्ये प्रा. सार्इबाबा अाणि ढवळे यांचाही समावेश अाहे. कबीर कला मंच या संघटनेला कायदेशीर सल्ला देण्याचे काम ते करतात. नागपूर पाेलिसांनी सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांना बंदी घातलेले साहित्य बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले हाेते. 

 
४) प्रा. शाेमा सेन  :प्रा. सेन नागपूर विद्यापीठात कार्यरत अाहेत. कडव्या विचारशैलीच्या डाव्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध असल्याचा संशय. पुणे येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत त्या सहभागी झाल्या हाेत्या. त्यांचा पती तुषारकांती भट्टाचार्य यांना मागील वर्षी अाॅगस्ट महिन्यात गुजरात पाेलिसांनी नक्षलवादी संबंधांवरून अटक केली हाेती अाणि सध्या ते जामिनावर बाहेर अाहेत.

 

 

५) महेश राऊत  :  नक्षलवाद्यांना शहरी मदत मिळावी याकरिता मध्यस्थ म्हणून राऊत भूमिका पार पाडताे. गडचिराेली येथे ताे राहताे. प्रधानमंत्री ग्रामविकास याेजनेचा फेलाे म्हणून ताे त्याची सहकारी हर्षाली पाेतदार हिच्यासह गडचिराेलीत वावरत असताना पाेलिसांना २०१३ मध्ये सापडला. नक्षलवादी नेत्यास जंगलात भेटण्याकरिता अाल्याचा संशय अाल्याने पाेलिसांनी पाेतदार व राऊत यांच्याकडे चाैकशी करून त्यांना साेडले हाेते. काही दिवसांपूर्वी राऊत हा नागपूर येथे राहण्यास अाला हाेता.

 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती....

बातम्या आणखी आहेत...