आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगावातील राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी टेंभुर्णीतून आणखी एकास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव भीमा येथील दंगलीदरम्यान घडलेल्या राहुल फटांगडे हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील टेेंभुर्णी येथून सूरज रणजित शिंदे (२२, टेंभुर्णी, जि. सोलापूर) नामक तरुणाला बुधवारी ताब्यात घेतले आहे. सीआयडीकडून काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या चार जणांच्या छायाचित्रांत सूरजचाही समावेश होता. 


कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात जमावाकडून राहुल बाबाजी फटांगडे (३०, रा. सणसवाडी) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. यात पूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. यातील दोघे जण नगरचे आहेत, तर एक जण अाैरंगाबाद येथील आहे. तपासादरम्यान सीआयडीला मिळालेल्या चित्रफितीत काही संशयित आढळले. ती चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानुसार खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टेंभुर्णीतून सूरजला ताब्यात घेतले.  दरम्यान, छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती सूरजला मिळाली होती. त्यामुळे तो टेेंभुर्णी येथे जाऊन लपला होता.

बातम्या आणखी आहेत...