आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा प्रकरण: अटकपूर्व जामिनासाठी मिलिंद एकबाेटेंचा न्यायालयात अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काेरेगाव-भीमा दंगल प्रकरणात शिक्रापूर पाेलीस ठाण्यात अॅट्राेसिटीच्या विविध कलमांनुसार  समस्त हिंदु अाघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे यांच्यावर गुन्हा दाखल अाहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा याकिता एकबाेटे यांचे वकील चिंतामणी घाटे यांनी न्यायालयात अर्ज केला अाहे. याप्रकरणी विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या न्यायालयाने 22 जानेवारी राेजी सदर अर्जावर सुनावणी करण्यात येर्इल असे अादेश दिले अाहे.

 

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील शिरुर तालुक्यात काेरेगाव-भीमा येथे एक जानेवारी राेजी विजय स्तभंला मानवंदना देण्यासाठी माेठया प्रमाणात नागरिक अाले असताना, दाेन गटात दंगल घडली हाेती. याप्रकरणी मिलिंद एकबाेटे यांच्यावर भादंवि कलम 307, 143, 147,148, 149, 295 (अ), 435, 436, शस्त्र कायदा 4,5 नुसार गुन्हा दाखल अाहे. 

बातम्या आणखी आहेत...