आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीमा काेरेगावात पूजाचा गूढ मृत्यू, दाेन संशयित अटकेत, नऊ जणांवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा सकट.... - Divya Marathi
पूजा सकट....

पुणे - कोरेगाव भीमा येथील पूजा सुरेश सकट हिचा मृतदेह विहिरीत सापडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी ९ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत, दोघांना अटक केली आहे. दरम्यान, अाम्ही राहत असलेल्या जागेबाबत काही लाेकांशी अामचा वाद सुरू हाेता, यातूनच पूजाची हत्या झाल्याचा संशय पूजाच्या वडिलांनी पाेलिसांकडे व्यक्त केला अाहे.   


पूजाचे काका दिलीप नानासाहेब सकट (रा. केडगाव, जि. नगर) यांनी फिर्याद दिली. कोरेगाव भीमा येथील कल्याणी फाटा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा आहे. तेथे रस्त्याच्या कडेला सकट परिवार राहत होते. त्यांनी ही जागा साेडावी यासाठी शेजारी वाद घालत हाेते. त्यामुळे १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकट यांनी पोलिसांत तक्रार देम संरक्षण मागितले. परंतु संरक्षण मिळाले नाही. १ जानेवारीला गावात दंगल उसळली.

 

दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी अामचे घर जाणीवपूर्वक जाळले.  याचे माझा मुलगा जयदीप व मुलगी पूजा हे साक्षीदार होते. त्यामुळेच त्यांना संपवून टाकण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचा अाराेप सुरेश सकट यांनी केला अाहे. जाळपाेळीच्या घटनेनंतर जयदीप व पूजाला अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. यासंदर्भात शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रारही दिली. ११ फेब्रुवारी राेजी पुन्हा धमकी आली. २० एप्रिल रोजी कर्जतच्या रातंजन येथे जत्रा असल्याने सुरेश व जयदीप हे गावी आले. मात्र २१ एप्रिल रोजी पूजा घरात नव्हती, तिचा शोध घेऊनही सापडली नव्हती. दुसऱ्या दिवशी घराजवळील शेतातील विहिरीत तिचा मृतदेह सापडला. तिच्या या मृत्यूला नऊ जण कारणीभूत असल्याने त्यांच्याविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात वडिलांनी तक्रार दिली. 

 

महिनाभरात पुनर्वसन   
सकट कुटुंबीयांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन व्हावे यासाठी पूजा प्रयत्न करत होती. पू्जाच्या मारेकऱ्यांना पकडण्याची मागणी करत गावकऱ्यांनी पूजाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. याची दखल घेत पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात सकट परिवाराचे म्हणणे ऐकून घेत एका महिन्यात या कुटुंबीयांचे पुनर्वसन करू,  आरोपींवर कडक कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...