आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- डाॅक्टरने उपचाराच्या बहाण्याने महिलेशी वाढवली ओळख, क्लिनिकमध्ये बोलवून केला विनयभंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव पार्क परिसरातील एक डाॅक्टरने एक महिलेला क्लिनिकमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 26 वर्षीय महिलेने मुंढवा पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन डॉ.गुरुगोकूलन भास्करन गुरुस्वामी (वय-30, रा.रामकृष्ण स्ट्रीट, टिचर कॉलनी, कोईमतूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एक आजाराने काही महिन्यांपासून त्रस्त आहे. तिची आरोपीशी फेसबूकवर ओळख झाली. त्यानंतर तिने आरोपीने फेसबूकवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अपॉईंटमेंट घेतली होती. त्यानुसार त्या उपचारासाठी ती त्याच्या क्लिनिकमध्ये गेली होती. दुपारच्या वेळी क्लिनिकमध्ये डाॅक्टरशिवाय कुणीही नव्हते. याचाच फायदा घेत त्याने पीडित महिलेचा विनयभंग केला असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी  सहायक पोलीस निरीक्षक खेडकर अधिक तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...