आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग, अब्रू वाचवण्यासाठी इमारतीवरुन मारली उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने पहिल्या मजल्यावरुन उडी मारल्याने तिच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. - Divya Marathi
महिलेने पहिल्या मजल्यावरुन उडी मारल्याने तिच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

पुणे- पिंपरी-चिंचवडील रहाटणी परिसरात मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून अज्ञात आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी बेडरुमच्या गॅलरीतून एक चारचाकीवर उडी मारली. यामध्ये महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वाकड पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी रात्री एकटीच घरामध्ये होती. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास अज्ञात आरोपी फिर्यादीच्या घरी आला. तो बळजबरीने महिलेच्या घरात घुसला आणि तिच्या गळ्याला चाकू लावला. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला.तु माझ्या मनासारखे केले नाही तर तुझ्या दोन्ही मुलांना मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. नराधमाच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी फिर्यादी महिलेने पहिल्या मजल्यावरुन बेडरुमच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये तिचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून डाव्या हाताच्या बोटाला मार लागला आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...