आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरायला नेण्याच्या बहाण्याने कापला पत्नीचा गळा, पोलिसांत स्वत: हजर झाला पती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरातील हनुमान टेकडी परिसरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोमल देवराम देवकर (वय 32) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर देवराम शेट्टी देवकर असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. ही घटना रविवारी घडली. यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. 

 

कोमल आणि देवराम हे पती-पत्नी वडारवाडी परिसरात राहत होते. कोमल ही गृहिणी होती तर देवराम लहान-मोठे मिळेल ते काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून देवराम हा कोमलच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि यातूनच त्यांच्यात वारंवार वाद होत होते. रविवारी दुपारी हे दाम्पत्य शहरातील हनुमान टेकडी भागात गेले होते. त्यावेळी देवरामने पुन्हा एकदा कोमलच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यांचा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात त्याने चाकूने कोमलच्या गळ्यावर वार केले यात ती जागीच गतप्राण झाली. यानंतर आरोपी निघून गेला. 

 

देवरामने घरी जाऊन कपडे बदलले आणि दारू पिऊन तो चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी त्याने पत्नीची हत्या केल्याचे स्वतः च पोलिसांना सांगितले. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा कोमल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

 

बातम्या आणखी आहेत...