आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या एकमेव आमदाराची महिला पोलिस अधिकार्‍याला धमकी, पुण्यात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्याविरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिला पोलिस अधिकार्‍याला धमकी दिल्याचा व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा अामदार सोनवणे यांच्यावर आरोप आहे.

 

महिला पोलिस अधिका-याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे हे जुन्नर विधानसभामतदार संघातून निवडून आलेले मनसेचे राज्यातील एकमेव आमदार आहेत. 

 

आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीऎक्षक ज्योती डमाळे यांनी आमदार सोनवणे यांच्या एका कार्यकर्त्याची बेकायदेशीर रेशनिंगच्या गव्हाची वाहतूक करणारी पिकअप पकडून कारवाई केली. याचा राग आमदारांना आला. ते पोलिस ठाण्यात आले आणि डमाळे यांना पोलिस स्टेशनला जमलेल्या 50-55 लोकांसमोर अर्वाच्य भाषेत अपमानित केले. शिवाय डमाळे यांच्या अंगावर ते धावून गेले. 

 

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती डमाळे यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात शासकीय काम करत असताना दबाब आणून शासकीय कामापासून परावृत्त केल्याच्या कारणावरून तक्रार दाखल केली आहे त्यानुसार त्यांच्याविरोधात भा.दं.वि.क.353,509,186,294 नुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...