आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात प्राध्यापिकेने गळफास घेऊन केली आत्महत्या, बंद खोलीत घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावरील तरुण प्राध्यापिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी समोर आला आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरु केला आहे. प्राध्यापिकेने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेले नाही. स्नेहश शहा (34) असे या महिलेचे नाव असून ती अविवाहित होती. ती पुण्यात क्लासेस घेत होती पण काही कारणाने तिने मागील महिन्यापासून क्लासेस घेणे देखील बंद केले होते. 

 

स्नेहलने आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या चिट्ठीत म्हटले आहे की, "मी स्वत:हून आत्महत्या करीत आहे, याला कोणालाही जबाबदार धरू नये. मी माझ्या आई-वडिलांशी कधी जास्त बोलले नाही. माझे आई-वडील खूप चांगले आहेत, त्यांना त्रास देऊ नये". मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...