आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सास-याच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी सुनने केली आत्महत्या, आरोपीला मिळाली पाच वर्षांची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सुनेवर वार्इट नजर ठेवून तसेच तिचा शारिरिक व मानसिक छळ करुन तिला अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने सासऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली अाहे. सुनिल मनाेहर परदेशी  असे शिक्षा झालेल्या अाराेपीचे नाव अाहे. 

 

भारती ललीत परदेशी (वय-25,रा.पर्वती पायथा, स्वारगेट,पुणे) या नवविवाहित महिलेने 21/6/16 राेजी अंगावर राॅकेल अाेतून घेत स्वत: पेटवून घेतले हाेते. यामध्ये ती 75 % भाजली हाेती. तिच्यावर ससून हाॅस्पिटल मध्ये औषधोपचार सुरु असताना, तिने मृत्युपूर्व जबाबात काेणा विराेधातही तक्रार दिली नव्हती. उपचार सुरु असताना तिचे 28/6/16 राेजी निधन झाले. त्यानंतर भारती हिची आर्इ सुमन रामू मदनवाले (रा.साेलापूर) यांनी पाेलीसांकडे भारती हिला तिची सासू कुंदा परदेशी व सासरे सुनिल परदेशी यांनी लग्न झालेपासून घालून पाडून बाेलणे, नवऱ्याजवळ बसू न देणे तसेच सासरा सुनिल परदेशी याने सुनेवर वार्इट नजर ठेवून तिचा मानसिक व शारिरिक छळ केल्याने भारती हिने अात्महत्या केल्याची तक्रार स्वारगेट पाेलीस ठाण्यात दिली. या गुन्हयाचा तपास महिला पाेलीस उपनिरीक्षक शाेभा क्षिरसगार, पाेहवा सुनिल कुलकर्णी यांनी करत, मयत भारती हिच्या पतीचे हे दुसरे लग्न असून पहिली पत्नी सासू-सासरे त्रास देतात म्हणून साेडचिठ्ठी देवून निघून गेल्याचा पुरावा मिळविला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करुन महत्वाचे साक्षीदारांचे जबाब नाेंदवले. अाराेपी विरुध्द सबळ पुरावे प्राप्त करुन न्यायालयात दाेषाराेपपत्र पाठविण्यात अाले. न्यायालयाने याप्रकरणी सासरा सुनिल परदेशी याला भादंवि कलम 306 व 498 नुसार पाच वर्ष कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...