आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलटण: लँड क्रूजर नीरा कालव्यात कोसळली, 6 जण वाचले, एक बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फलटण- पुणे-पंढरपूर मार्गावर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुळदेव हद्दीतील रावरमोशी येथे नीरा कालव्यात गुरुवारी मध्यराक्षी एक लँड क्रूजर जीप कोसळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही जीप थेट कॅनॉलमध्ये पोहचली. या जीपमधून सात मजूर प्रवास करत होते. सुदैवाने सर्वच्या सर्व सात मजूरांना पोहता येत होते. मात्र, एक जण गाडीत अडकून बसला, उर्वरित सहा जणांनी पोहून किनारा गाठला. संबंधित प्रवासी मजूर हे नांदेड जिल्ह्यातील आहेत.

 

हे मजूर गवंडी काम करतात. कामानिमित्त ते महाबळेश्वर येथे गेले होते. तेथून नांदेडकडे परतत असताना मध्यरात्री ही घटना घडली. चालकाला वळणावर नीरा कालव्याचा कॅनॉल आहे लक्षात आले नाही व त्याची जीप थेट पाण्यास कोसळली. दरम्यान, फलटण शहर पोलिस व इतर यंत्रणांनी क्रेनच्या मदतीने वाहन काढण्याचे काम केले. गाडीत अडकलेल्या व्यक्तीविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...