आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरड कोसळल्याने सिंहगड मार्ग बंद, रविवार-पावसात फिरण्याचा पर्यटकांचा प्लान पाण्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सिंहगडावरील घाटमार्गावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला. रविवारीची सुट्टी आणि पाऊस असा दुहेरी संगम असल्याने हजारोच्या संख्येने गडावर जाण्याच्या तयारीत असलेल्या पर्यटकांची निराशा झाली. गेल्या वर्षी ३० जुलै २०१७ रोजी सायंकाळी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती. त्याच्या जवळच आजचा प्रकार घडला आहे.

 

हवेली पोलिसांनी घाट रस्ता बंद केला असून दरड हटविण्यासाठी जेसीबी मागविण्यात आले असून हे कधी पूर्ण होईल, हे सध्या तरी सांगता येणार नाही. किमान आज दिवसभर तरी रस्ता बंद राहण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.

 

पावसाळा आणि त्यात रविवारी असल्याने हजारो पर्यटक खडकवासला, सिंहगडवर धाव घेतात. परंतु, या घटनेमुळ गडावरील रस्ता बंद झाल्याने अनेकांची निराशा झाली. त्यांना खालूनच परत फिरावे लागले.

बातम्या आणखी आहेत...