आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भारतीय असंतोषाचे जनक\' होते टिळक, आजच्या दिवशी झाली होती मंडालेच्या तुरुंगातून सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतीयांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी उभे आयुष्य खर्ची केले. त्यामुळे त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हटले जाते. राजद्रोहाच्या खटल्यात लोकमान्यांना सहा वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. ब्रह्मदेशातील मंडाले येथील कारागृहात त्यांना पाठवण्यात आले होते. मंडाले येथून ८ जून १९१४ रोजी त्यांची मुक्तता करण्यात आली आणि तेथून मद्रास व रेल्वेमार्गे प्रवास करत ते १५ जून रोजी पुण्यात परतले. आजच्या दिवशी त्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली होती.


टिळकांच्या आयुष्याची सुरूवात....
टिळकांच्या लहान वयातच आईचे छत्र हरवले व वडिलांच्या सोळाव्या वर्षी वडिलांचाही मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे काका गोविंदपंत यांनी टिळकांचा सांभाळ केला. त्यांनी नेहमीच टिळकांना शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी मृत्युपूर्वी टिळकांचा विवाह सत्यभामाबाई उर्फ तापीबाई यांच्यासोबत लावून दिला. त्यावेळी टिळक अतिशय कृश शरीरयष्टीचे होते व तापीबाई सुदृढ होत्या. यावरून त्यांचे मित्र त्यांना चिडवत असत म्हणून टिळकांनी नियमित कसरत आणि व्यायाम करून एका वर्षात उत्तम शरीरयष्टी कमावली. त्यावर्षी प्रथम वर्षाच्या परीक्षेत ते नापास झाले परंतु टिळकांच्या मते ते वर्ष फुकट गेले नसून पुढील आयुष्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होण्यासाठी कामी आले.


‘सूर्याचे पिल्लू’ 
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचे जन्मनाव केशव गंगाधर टिळक असे होते परंतु त्यांना त्यांच्या 'बाळ' य टोपण नावाने ओळखले जाई. टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते आणि गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांच्या कुशाग्र बुद्धी मुळे त्यांचे शिक्षक त्यांना ‘सूर्याचे पिल्लू’ म्हणत. लहानपण पासूनच टिळकांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांचा कणखर बाणा आणि बंडखोर वृत्ती लहानपणा पासूनच दिसत होती.


शेकडो क्रांतिकारकांनी टिळकांच्या शिक्षेतून प्रेरणा
न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल, पण वस्तुजाताच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हालअपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे, असाही परमेश्वराचा संकेत असेल, असे उद्गार न डगमगलेल्या टिळकांनी खटल्याच्या सुनावणीनंतर काढले. लोकमान्यांच्या या धीरोदात्त उद्गारांनी अपेक्षित परिणाम साधला. मुंबईच्या गिरणी कामगारांनी प्रथमच हरताळ पाळला. देशात अनेक ठिकाणी इंग्रजांविरोधात दंगे उसळले. शेकडो क्रांतिकारकांनी टिळकांच्या शिक्षेतून प्रेरणा घेतली.


'देशाचे दुर्भाग्य'
'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्रांमधून ब्रिटिश सत्तेविरोधात टिळकांचे जहाल लेखन सुरू होते. या लेखनाचे चटके लंडनला बसू लागले होते. सन 1908 च्या 12 मे रोजी 'केसरी'तून 'देशाचे दुर्भाग्य' आणि 9 जूनला 'हे उपाय टिकाऊ नाहीत' हे दोन अग्रलेख प्रसिद्ध झाले. या अग्रलेखांवरून टिळकांविरोधात देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यांना सहा वर्षे कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. 24 जून 1908 ला टिळकांना मुंबईत ताब्यात घेण्यात आले. वयाच्या 52 व्या वर्षी व्याधींनी पोखरलेले शरीर, कुटुंबीयांची काळजी आणि स्वातंत्र्यलढ्याची चिंता सोबत घेऊन टिळक मंडालेच्या तुरुंगात जाण्यास सज्ज झाले.


तुरुंगातच लिहिला 'गीतारहस्य' ग्रंथ
१९०८ मध्ये सुद्धा त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. या काळात त्यांना ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. हा तुरुंगवास भोगत असतानाही त्यांनी 'गीतारहस्य' आणि 'ओरायन, द आर्क्टिक होम ऑफ वेदाज' हे महत्वपूर्ण ग्रंथ लिहिले. टिळकांनी निर्भीडपणे लिहिलेले लेख आणि ब्रिटीश सरकार कडून सामान्य जनतेवर होणारया अत्याचारावर वेळोवेळी उठवलेली टीकेची झोड यातून टिळकांनी ब्रिटीश साम्राज्यला कठोर प्रतिकार केला. भारतीयांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी उभे आयुष्य खर्ची केले. म्हणूनच टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते.

 

बातम्या आणखी आहेत...