आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राची परंपरा जपणारे जेष्ठ कलावंत लोकशाहीर गफूरभाई पुणेकर यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ज्येष्ठ तमाशा कलावंत लोकशाहीर गफूर भाई पुणेकर यांचे आज सकाळी पुणे येथे निधन झाले. पुणेकर यांनी आयुष्यभर महाराष्ट्राची परंपरा जपणार्‍या कला जीवंत ठेवण्याचे अनमोल कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना 'कलाभुषण' पुरस्कार देवून सन्मानित केले होते.


कलाभुषण शाहीर गफूरभाई पुणेकर यांनी गेली 50 वर्ष रंगभूमीवर अनेक लोकनाट्य तमाशा, नाटक, एकपात्री नाटक, नकला, बहुरुपी भारुड, बहुरुपी शाहीरी, अध्यात्म चरित्राची शाहीरी, पोवाडे, शिवचरित्र शाहीरी पोवाडे, आध्यत्मिक किर्तन, प्रवचनं, अशा सर्व कलांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रसिकांची सेवा केली. 

 

महाराष्ट्र राज्य कलाभुषण व लोकनाट्य-चित्र-कलाकार कल्याण मंडळाचे ते अध्यक्ष होते. लोकरंजनातून लोकशिक्षणासाठी त्यांनी अखंड महाराष्ट्र जागविला. आज दुपारी 4 वाजता (सैय्यद नगर) हडपसर येथून त्यांची अंत्ययात्रा निघेल. सायलिएसबेरी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...