आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळा: माजी नगराध्यक्षा उषा चौधरींच्या बंगल्यात चोरी; 12 लाखांचा ऐवज लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- घरात कोणी नसताना लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष उषा चौधरी यांच्या बंगल्यात चोरी झाली आहे. यात 35 तोळे सोन्यासह इतर वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही कॅमे-याचीही चोरीच्या आधी तोडफोड करण्यात आली. चौधरी या कुटुंबासह पुण्यात गेल्या होत्या, तेव्हा त्यांच्या बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला. यात 12 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंब हे काही काम निमित्त पुण्यात गेले होते. हीच संधी साधत बुधवारी सायंकाळ ते रात्री साडेनऊच्या दरम्यान नऊ जणांच्या टोळक्याने माजी नगराध्यक्ष उषा चौधरी यांच्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या बंगल्यात खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. 35 तोळे सोने, चार लाख रूपये रोख रक्कम तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी तब्बल 12 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे, अशी फिर्याद उषा चौधरी यांनी लोणावळा पोलिसांत दिली आहे.

 

यात मंगळसूत्र, पाटल्या, कर्णफुले, बांगड्या आणि नेकलेस आदी दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अज्ञांत नऊ जणांविरोधात लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दरेकर करत आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेतील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...