आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा अपघात, बोगी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक विस्कळीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मदुराई एक्स्प्रेसचा घसरून अपघात झाला. शुक्रवारी (6 जुलै) पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेमुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

घसरलेली बोगी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डाऊन लाईन पूर्णपणे बंद असल्यामुळे मिडल लाईन वरून वाहतूक सुरू आहे. सर्व गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत.

 

पुण्याच्या दिशने येणारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेस खंडाळा घाट चढून येत होती, तेवढ्यात गाडीच्या मागील बँकरची जोरदार धडक डब्याला बसली. त्यामुळे हा अपघात झाला. बोगीचे प्रचंड नुकसान झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 

या गाड्या रद्द...
>पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस 
> पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस 
> पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल
> भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 
>पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस 

बातम्या आणखी आहेत...