आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; सत्यपाल सिंह यांच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी अशीच बोगस आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी  केला आहे. पीएचडीची पदवी घेणाऱ्या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे, असे त्यांनी सांगितले. हा सगळा प्रकार गंभीर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आता ते मंत्री नेमके कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

 


पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आंध्र प्रदेशातील तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात आलेल्या 'फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग'चे उदघाटन डॉ. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ‌डॉ. सिंग म्हणाले, 'पीएचडीची पदवी घेतलेल्या अनेकांना पीएचडी शब्दाचा लाँगफॉर्मही सांगता येत नाही. त्या त्या विषयाचे व्यवस्थित आणि सविस्तर ज्ञान नसताना देखील पदवी घेऊन बसले आहेत. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांने अशाच प्रकारे बोगस पीएचडी पदवी मिळवली आहे. त्या मंत्र्याने मला त्यांनी पीएचडी केलेल्या विषयाची माहिती दिली होती. मात्र, तो विषय सांगण्यालायकदेखील नाही." 

 


त्या मंत्र्याने ज्या विद्यापीठातून ही पदवी मिळवली होती. तिथल्या संबधित विभागाच्या प्रमुखांना मी फोन केला. या विषयात पीएचडी करण्यास तुम्ही मान्यताच कशी दिली, अशी विचारणा मी त्यांना केली होती. तेव्हा वरिष्ठ पातळीवरून त्या विषयाला मान्यता आणि त्याचबरोबर पदवी देण्यास माझ्यावर दबाव आल्याचे त्यांनी सांगितले, अशी धक्कादायक माहिती सत्यपाल सिंह यांनी दिली.

 

 

महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात होते असे प्रकार

केवळ महाराष्ट्र नाही तर उत्तर प्रदेशात देखील असे प्रकार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर तो मंत्री कोण याबाबत डॉ. सत्यपाल सिंह यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र माझे नाव 'सत्य'पाल आहे', असे म्हणून मी जे बोलतो ते खरंच बोलतो, असा निर्वाळा त्यांनी दिला. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...