Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | mansoon entry in maharashtra on 4 june

मान्सून यंदा दोन दिवस आधीच येणार; महाराष्ट्रातही निर्धारित वेळेअाधीच पाेहाेचण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी | Update - May 19, 2018, 01:17 AM IST

यंदा नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून दोन दिवस लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयए

 • mansoon entry in maharashtra on 4 june

  औरंगाबाद - यंदा नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून दोन दिवस लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मान्सून केरळात २९ मे रोजी दाखल होईल असे शुक्रवारी जाहीर केले. गतवर्षी केरळात मान्सून ३० मे रोजी पोहोचला होता. यंदा सरासरीइतका पाऊस होईल असा अंदाज यापूर्वीच आयएमडीने वर्तवला आहे. मोसमी वाऱ्याची सर्व गणिते अचूक राहिल्यास महाराष्ट्रातही मान्सून निर्धारित वेळेआधीच पोहोचण्याची शक्यता आहे.


  सर्वसाधारणपणे केरळात १ जून रोजी मान्सून दाखल होतो, असे मानले जाते. गतवर्षी आयएमडीने ३० मे रोजी मान्सून दाखल होईल असे म्हटले होते. त्यानुसार गतवर्षी
  आयएमडीचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता.

  आयएमडीने यंदा मान्सून २९ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचे जाहीर केले आहे. हा अंदाज व्यक्त करताना त्यात ४ दिवस मागेपुढे होण्याची शक्यता असल्याचेही अायएमडीने म्हटले आहे. दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या अाठवड्यात आयएमडी मान्सूनच्या भारतातील आगमनाबाबत भाकीत व्यक्त करते. त्यानुसार यंदा आयएमडीने त्यांच्या ६ निकषांवर आधारित सांख्यिकी मॉडेलच्या मान्सूनच्या आगमनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.त्यानुसार अंदमान समुद्र आणि अाग्नेय बंगालच्या उपसागरात २३ मे रोजी मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता अाहे.

  मागील ५ वर्षातील मान्सूनचे आगमन आणि भाकीत : आयएमडी २००५ पासून मान्सूनच्या आगमनाविषयी अंदाज व्यक्त करते. मागील १३ वर्षांत (२००५ ते २०१७) या काळात २०१५ चा अपवाद वगळता, आगमनाचे सर्व अंदाज अचूक ठरल्याचा दावा आयएमडी केला आहे.

  मान्सून अंदाजासाठी आयएमडीचे मॉडेल ६ निकषांवर

  * वायव्य भारतातील किमान तापमान
  * दक्षिण द्वीपकल्पातील पूर्व मोसमी पावसाची स्थिती
  * दक्षिण चीन समुद्राकडून उत्सर्जित होणारे दीर्घ तरंगीय विकिरण (ओएलआर)
  * आग्नेय हिंदी महासागराच्या तपांबर (पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२ किमी उंचीपर्यंतचा हवेचा थर) मधील खालच्या भागातील वारे
  * पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागराच्या तपांबराच्या वरच्या भागातील वारे { नैऋत्य प्रशांत महासागराकडून उत्सर्जित होणारे दीर्घ तरंगीय
  विकिरण विश्लेषण.

 • mansoon entry in maharashtra on 4 june

Trending