Home | Maharashtra | Pune | maratha kranti morcha protest in sangali, kolhapur, pune,nashik

पुणे, कोल्‍हापूर, सांगली येथे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, लोकप्रतिनिधींच्‍या घरासमोर ठिय्या

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Aug 02, 2018, 02:54 PM IST

राज्‍यात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्‍या घर तसेच कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनं करण्‍यात येत आहे.

 • maratha kranti morcha protest in sangali, kolhapur, pune,nashik
  पुणे येथे गिरीश बापट यांच्‍या कार्यालयासमोर आंदोलन करताना आंदोलक.

  पुणे/कोल्‍हापूर/सांगली - मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी मुंबईत मराठा समाजातील मान्‍यवरांसोबत मुख्‍यमंत्र्यांची बैठक चालू असताना राज्‍यात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्‍या घर तसेच कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनं करण्‍यात येत आहे.

  याची सुरूवात आज सकाळी पुण्‍यात झाली. पुण्‍याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्‍या कसबा गणपतीजवळील कार्यालयासमोर मराठा कार्यकर्त्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची कल्‍पना असल्‍यामुळे सकाळपासून कार्यालसमोर मोठा फौजफाटा तैनात करण्‍यात आला होता. आंदोलनांतर स्‍वत: बापट यांनी आंदोलनकर्त्‍यांचे निवेदन स्‍वीकारले व त्‍यांच्‍याशी बातचीत केली. चर्चेवेळी मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण देण्‍याची मागणी आंदोलकांनी केली असता, घाईगडबडीत निर्णय घेतला तर कोर्टात हा निर्णय टिकणार नाही. त्‍यामुळे आंदोलकांनी संयम बाळगावा. हिंसा करू नये, असे आवाहन गिरीश बापटांनी आंदोलकांना केले.

  त्‍यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा राज्‍यसभेच्‍या खासदार वंदना चव्‍हाण यांच्‍या घराकडे वळावला. तेथे आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र पावसाळी अधिवेशनानिमित्‍त वंदना चव्‍हाण दिल्‍लीत असल्‍याने त्‍यांच्‍या पतीने त्‍यांच्‍यातर्फे निवदेन स्‍वीकारले.


  कोल्‍हापूरमध्‍ये शिवसेना आमदाराच्‍या कार्यालयासमोर आंदोलन
  हातकणंगले येथे मराठा क्रांती मोर्चा महिलांच्‍या वतीने शिवसनेचे आमदार सुचित मिणचेकर यांच्‍या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्‍यात येत आहे. याप्रसंगी महिला 'आरक्षण द्यावे, अन्‍यथा बांगड्या भराव्‍यात', अशा घोषणा देत आहे.

  सांगलीमध्‍ये रास्‍ता रोको
  सांगलीजवळ माधवनगर येथे सकल मराठा समाजाच्‍या वतीने रास्‍ता रोको करण्‍यात येत आहे. शेकडो कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरले असून त्‍यांनी रस्‍त्‍यावरच ठिय्या आंदोलन सुरू केल्‍याची माहिती आहे.

  नाशिकमध्‍ये मुंडण आंदोलन
  मराठा आरक्षणासंदर्भात शासन वेळकाढूपणा करत असल्‍याचा आरोप करत लाखलगाव येथील सकल मराठा समाजाच्‍या वतीने मुंडण आंदोलन करण्‍यात आले. आंदोलनाच्‍या माध्‍यमातून मराठा तरुणांवर शासन गुन्‍हे दाखल करत आहे, मुलांना आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त करत आहे, याच्‍या निषेधार्थ हे मुंडण आंदोलन केले जात असल्‍याचे, आंदोलकांनी सांगितले. सरकारने त्‍वरीत आमच्‍या मागण्‍या सोडवाव्‍यात अन्‍यथा आंदोलन आणखी आक्रमक केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, आंदोलनाचे फोटोज...

 • maratha kranti morcha protest in sangali, kolhapur, pune,nashik
 • maratha kranti morcha protest in sangali, kolhapur, pune,nashik
  सांगली येथे आंदोलकांनी रास्‍ता रोको केला.
 • maratha kranti morcha protest in sangali, kolhapur, pune,nashik
  नाशिक येथे मुंडण आंदोलन करून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला.

Trending