Home | Maharashtra | Pune | Maratha Kranti Morcha protesters blocked Pune-Mumbai highway

मराठा क्रांती मोर्चा आंदोलकानी पुणे-मुंबई महामार्ग अडवला, मावळमध्‍ये कडकडीत बंद

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 04:30 PM IST

राज्यात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा उद्रेक कमी होत नसल्याचं दिसून येत आहे

 • Maratha Kranti Morcha protesters blocked Pune-Mumbai highway

  पिंपरी चिंचवड - राज्यात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा उद्रेक कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील मावळ परिसरात आज सकाळी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रोखण्‍यात आला. आंदोनकर्त्यानी महार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र महामार्ग पोलिसांनी ताबडतोब घटनास्‍थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाजूला केले आणि महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. मराठा क्रांती मोर्चाच्‍या कार्यकर्त्यांनी मावळ परिसरात जोरदार घोषणाबाजी करत पदयात्रा काढल्‍या आल्या आहेत. यामुळे मावळमध्‍ये कडकडीत बंद आहे.

  जुना पुणे-मुंबई महामार्ग बंद केल्यानंतर आंदोलकांनी आता द्रुतगती मार्गाकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्‍यापूर्वी आंदोलकांकडून कामशेत बोगदा आणि उर्से टोलनाक्यावर ठिय्या आंदोलनही करण्यात आले. आंदोलनामुळे बराच वेळ एक्सप्रेस वे आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी भररस्त्यावर टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. जुन्‍या महामार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने वळविण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा दोन्ही महामार्गावर तैनात करण्‍यात आला आहे.


  आयोजकांचे शांततेचे आवाहन
  स्थानिक व्यवसायिकांसह शाळा, मह‍विद्यालये, वाहतुकदार यांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. लोणावळा, कार्ला, कामशेत, कान्हेफाटा, वडगाव, तळेगाव, देहूरोड, पवनानगर या महत्वाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्‍यांनी महाराष्ट्र शासनाचा व मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. कळंबोली येथे काल घडलेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन शांततेमध्ये करण्याचे आवाहन मावळच्या समन्वय समितीने केले आहे.


  प्रशासनाची खबरदारी
  काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील खबरदारी घेण्यात आली आहे. बंदच्या पार्श्वभुमीवर आज सकाळपासून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक थंडावली असून अतिशय तुरळक वाहने रस्त्यावर पहायला मिळत आहेत. बाजारपेठादेखील बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे.


  महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी
  कार्ला फाटा येथे सुमारे एक तास रास्ता रोको करत 'मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे', 'मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यत नोकरी भरती प्रक्रिया रद्द करावी', 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे' अशा घोषणा देण्‍यात आल्‍या. या रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा मोठी वाहतुक कोंडी झाली होती.

 • Maratha Kranti Morcha protesters blocked Pune-Mumbai highway
 • Maratha Kranti Morcha protesters blocked Pune-Mumbai highway

Trending