आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा कोरगांव- राहुल फटांगडे हत्याप्रकरण, आरोपींची माहिती देणा-यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरगांव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडे या युवकाची हत्या झाली होती. या हत्येरप्रकरणी आणखी चार आरोपींचे फोटो सीआयडीने शुक्रवारी जारी केले होते. तसेच राहुल याच्यावर हल्ला करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी चार आरोपींची माहिती देण्याचे आव्हान केल्यानंतर आता ही माहिती देणा-यांना मराठा युवा क्रांती 50 हजार रुपयांचा इनाम देणार आहे. 

 

1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती तर अनेक जण जखमी झाले होते. तर जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राहुल बाबाजी फटांगडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शिवाजी महाराजांचा फोटो असलेला टी शर्ट घातल्यानेच त्याच्यावर हल्ला करण्यात बोलले जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...