आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी पत्नीची झाली होती हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलीप कोल्हटकर - Divya Marathi
दिलीप कोल्हटकर

पुणे- ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर (वय 72) यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. कोल्हटकर मागील काही काळापासून दीर्घ आजाराने त्रस्त होते. मराठी रंगभूमीवर गाजलेले 'मोरूची मावशी' या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांच्यामागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तीन महिन्यापूर्वीच त्यांची पत्नी दिपाली कोल्हटकर यांची नोकरानेच हत्या केल्याचे समोर आले होते. 

 

दिलीप कोल्हटकर मागील काही काळापासून आजरपणाने त्रस्त होते. पुण्यातील मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सध्या ते घरीच उपचार घेत होते. आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाटकांसोबतच त्यांनी काही मराठी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते. एका हिंदी चित्रपटातही त्यांनी अभियन केला होता. कोल्हटकर यांनी अनेक लोकप्रिय नाटके दिली. 

 

कोल्हटकर यांचा मुलगा सध्या अमेरिकेत असून, तो भारतात आल्यानंतरच कोल्हटकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...