आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी घराण्यात जन्मले होते चाफेकर बंधू, क्रूरकर्मा रँडचा असा केला वध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी २४ जून १८६९ रोजी दामोदर चाफेकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव दमोदर यांच्यावर होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकाऱ्या चार्ल्स रँड आणि आयर्स्टची हत्या केली. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील एरवडा तुरूंगात फाशी दिली. आज त्यांची जयंती आहे. या निमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना त्यांच्याविषयीची माहिती देत आहे....

 
दामोदरपतांचे बालपण...

लहानपणापासूनच दामोदर चाफेकर यांना व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रांना संघटीत करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली. इंग्रजांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरि चाफेकर व वासुदेव हरि चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होत होते.या तिन्ही भावांना चाफेकर बंधु नावाने ओळखले जाते. हे तिन्ही भाऊ लोकमान्य टिळक यांच्या संपर्कात होते. टिळकांना ते गुरू मानत होते. त्यांचे वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चापेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. विठ्ठलभक्ती करणाऱ्या या मराठी कुटुंबाने देशासाठी प्राण अर्पण करणारे 3 तरणीबांड मुलेही दिली. 

 

रँडची गोळ्या झाडून हत्या...
पुण्यामध्ये १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली आणि अत्याचाराचा हौदोस घातला. यामुळे इंग्रजांविरोधात असंतोष पसरू लागला. तत्कालीन जिल्हाधिकारी वाल्टर चार्ल्स रँड हा अत्यंत क्रुर, खुनशी होता. पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात तो सर्वात पुढे होता. बाळ गंगाधर टिळक आणि आगरकर यांनी या अत्याचाराविरोधात टिका केली. यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. दरम्यान, दामोदरपंतांनी रँडचा वध करण्याची योजना आखली. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत रँड आणि त्याचा सहकारी लेफ्लिनंट आयस्टर यांची एका कार्यक्रमाहून परतत असताना गोळ्या झाडून हत्या केली.

 

१८ एप्रिल १८९८ रोजी फाशी...
गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांना हल्लेखोरांची नावे कळाली आणि त्यांनी दमोदरपंतांना अटक केली. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चापेककर, तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील एरवडा तुरूंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चापेककरांना ८ मे १८९९ रोजी तर बाळकृष्ण चाफेकरांना आणि महादेव रानड्यांना १० मे १८९९ रोजी फाशी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...