आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरेगाव भीमा हिंसाचार: आरोपी मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराचा प्रमुख आरोप असेलेले मिलिंद एकबोटे यांना आज जामीन मंजूर करण्यात आला. 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर पुणे सत्र न्यायालयाने एकबोटेंना हा जामीन मंजूर केला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली 14 मार्च रोजी मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना घरी जाऊन अटक केली होती. त्याआधी ते 75 दिवस फरार होते व त्यादरम्यान ते कोर्टात जामीनासाठी धाव घेत होते. मात्र, पुणे सत्र न्यायालय, मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर अटक करण्यात आली होती. मात्र, आता महिन्याभरातच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

 

1 जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर खुनाचा प्रयत्न, चिथावणी देणे, दगडफेक करणे याप्रमाणे अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...