आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींची ‘हनिमून पार्टी’; पुण्यातील मेजर जनरलची छत्तीसगडला बदली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खडकवासला येथील मिलिटरी इन्स्टिट्यूट अाॅफ टेक्नाॅलाॅजी (एमअायएलअायटी) येथील एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीने युवा अधिकाऱ्यांच्या पत्नींसाठी ‘हनिमून थीम’वर अाधारित पार्टीचे अायाेजन केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची तक्रार संबंधित पार्टीतील महिलांनी दिल्लीतील लष्करी मुख्यालयाकडे केल्यानंतर लष्कराने हे प्रकरण गांभीर्याने घेत मेजर जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याची बदली थेट छत्तीसगडला केली अाहे.    


एमअायएलअायटी येथे युवा लष्करी अधिकारी हे तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी येत असतात. लष्करी कॅम्प असलेल्या परिसरातील अधिकाऱ्यांच्या पत्नींनी एकत्र येण्यासाठी दर महिन्याला केवळ महिलांसाठी पार्टीचे अायाेजन करण्यात येते. या पार्टीचा एक विषय (थीम) निश्चित करून त्यानुसार पार्टीसाठी विशिष्ट पेहराव सर्वांनी करायचा असताे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नीतर्फे सर्व अधिकाऱ्यांच्या पत्नींना पार्टीचे अामंत्रण दिले जाते. एमअायएलटी परिसरात अाठ नाेव्हेंबर राेजी एका पार्टीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. मात्र त्याची थीम ‘हनिमून’ ठेवण्यात अाली हाेती. त्यानुसार पार्टी हाॅलच्या मध्यभागी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला एक पलंग ठेवण्यात अाला हाेता. तसेच पार्टीच्या परिसरात मादक महिलांचे  पाेस्टर, घाेेषवाक्य लावण्यात आले होते.   
व्हॉट्सअॅपवर फोटो व्हायरल  

पार्टीला अाल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींना हा प्रकार समजला. त्यामुळे त्या नाराज झाल्या व त्यांनी पार्टीचे फाेटाे लष्कराच्या व्हाॅट्सअॅप ग्रुप अाणि साेशल मीडियावर प्रसारित केले. त्यानंतर अनेकांनी या प्रकाराबाबत टीका केली, तर काही महिलांनी पार्टीनंतर याबाबत थेट दिल्लीतील लष्करी मुख्यालयात तक्रार केली. लष्कराने हे प्रकरण गांभीर्याने घेत चाैकशी करून मेजर जनरल अधिकाऱ्याची रवानगी छत्तीसगडला केली.

बातम्या आणखी आहेत...