आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी अधिकाऱ्यांनो तंत्रज्ञान अात्मसात करा; सतीशकुमार दुआ यांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -   देशाला कुशाग्र आणि चाणाक्ष बुद्धिमत्तेसोबत अद्ययावत तंत्रज्ञानाचा सहज वापर करू शकणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात तुम्ही ‘स्कॉलर वॉरियर’ होण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीशकुमार दुआ यांनी भावी लष्करी अधिकाऱ्यांना मंगळवारी दिला.   


खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीच्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. या वेळी एनडीएचे कमांडंट एअर मार्शल आय.पी. विपिन, डेप्युटी कमांडंट एस. के.ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला  उपस्थित होते. या वेळी बीएस्सी कॉम्प्युटर शाखा, बीएस्सी (सायन्स) शाखा आणि कला शाखेतून बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेतून एकूण ३३६ कॅडेट्सना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. यामध्ये ८ विद्यार्थी परदेशातील आहेत.

 

बीएस्सी कॉम्प्युटर शाखेतून एस. एस. बिष्ट याला चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी व रौप्यपदक, कला शाखेतून पी. एम. किरण याला चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी व रौप्यपदक आणि बीएस्सी शाखेतून जी. के. रेड्डी याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी व रौप्यपदक प्रदान करण्यात आले.   
दुअा म्हणाले, एनडीएतून उत्तीर्ण झाल्यावर आपण यशस्वी झालो, असे समजू नका. तुमच्या मेहनतीला आणि यशाला एका मर्यादेत बांधून ठेवू नका.  त्यामुळे यापुढे येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करा. तुमच्यामध्ये सांघिकतेची भावना निर्माण करा.

 

लष्करात काम करताना नेहमी सांघिक भावनेला महत्त्व देऊन ती अधिक दृढ कशी करता येईल, याकडे आपण भावी अधिकारी म्हणून लक्ष दिले पाहिजे. तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा काम कराल, तेव्हा तुमच्या एका निर्णयावर शेकडो सैनिकांचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. तुमच्यामध्ये कठीण परिस्थितीत नेतृत्व करण्याची क्षमता असलीच पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या समस्यांकडे आव्हाने म्हणून पाहा. दरम्यान, तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी सातत्याने वाचन करा आणि स्वत:ला ज्ञानाने परिपूर्ण करा, असा माैलिक सल्ला त्यांनी कॅडेट्सना दिला.

 

बातम्या आणखी आहेत...