आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE- पिंपरीत मंदिरात भरदिवसा चिमुकलीवर बलात्कार, पोलिसांनी केली आरोपीला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पिंपरीमधील खराळवाडी परिसरात मंदिरात खेळत असलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला कोर्टात हजर केले असता 18 जून पर्यंत पोलिस  कोठडी सुनावण्यात आली आहे. हा प्रकार भागवत गीता मंदिरात शनिवारी (9 जून) सकाळी 11 वाजता घडला होता. पोलिसांनी रोहन दिलीप भांडेकर (18) याला अटक केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी सकाळी 11 वाजता मंदिरात खेळत होती. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने तिला खेळण्याच्या बहाण्याने मंदिरात आडबाजूला नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. हा घडलेला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईला सांगितला. त्यांनतर आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता त्याला रविवारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...