आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: जिग्नेश मेवानींच्या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू आघाडीचा विरोध, वातावरण पेटणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिग्नेश मेवानींच्या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी विरोध केला आहे. - Divya Marathi
जिग्नेश मेवानींच्या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी विरोध केला आहे.

पुणे- 31 डिसेंबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर होणाऱ्या ‘एल्गार परिषदे’ला गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी हा भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत उपस्थिती लावणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला ‘समस्त हिंदू आघाडी’चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी विरोध दर्शविला आहे. हा कार्यक्रम झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हा कार्यक्रम होऊ नये याबाबत त्यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिले आहे. 

 

एकबोटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एल्गार परिषदेस समस्त हिंदू आघाडीचा विरोध आहे. शनिवारवाड्यावर नियमानुसार केवळ सांस्कृतिक कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. मात्र एल्गार परिषद कार्यक्रम हा राजकीय स्वरूपाचा असून त्याला देण्यात आलेली परवानगी महापालिका नियमांचे उल्लंघन करणारी आहे. शिवाय या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्ये केली जाणार हे उघड आहे. त्यामुळे महापालिकेने एल्गार परिषदेला परवानगी देता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याचे एकबोटे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

 

दरम्यान, महापौर मुक्ता टिळक यांना म्हटले आहे की, एल्गार परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र यामध्ये काही राजकीय व्यक्ती सहभाग घेणार आल्याचे समजते त्यामुळे हा कार्यक्रम जर राजकीय असल्यास नियमाप्रमाणे परवानगी देणे शक्‍य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम नियमांननुसार नसल्यास यांची परवानगी नाकारण्याचा सूचना प्रशासनला दिल्या आहेत.

 

हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला आहे. तर एल्गार परिषदेच्या आयोजकांनी हा कार्यक्रम ठरल्यानुसार होईलच असे म्हटले आहे. राजकीय दबावाला बळी पडून पोलिस व प्रशासनाने आम्हाला दिलेली परवानगी रद्द केली तर आम्ही शनिवारवाड्याबाहेर रस्त्यावर एल्गार परिषद भरवू असे म्हटले आहे.

 

पुढे स्लाई़डद्वारे वाचा, यासंबंधित माहिती....

बातम्या आणखी आहेत...