आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे बाल बाल बचावले, गाडी दरीत कोसळता कोसळता राहिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार शशिकांत शिंदे.... - Divya Marathi
आमदार शशिकांत शिंदे....

सातारा- साता-यातील कोरेगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे हे रविवारी रात्री भीषण अपघातातून बाल बाल बचावले. घाट परिसरातून रविवारी रात्री उशिरा जात असताना रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून वेगाने जाणारी शिंदे यांची फॉर्च्यूनर गाडी घसरली व चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या कडेवरून दरीत कोसळणार होती. मात्र, गाडी एका झाडाला अडकल्याने आमदार शिंदे व त्यांचा वाहनचालक बचावले. गाडी झाडाला अडकल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून शिंदे व त्यांच्या चालकाने उडी मारून आपले प्राण वाचवले. या घटनेत आमदार शिंदे किरकोळ जखमी झाले आहेत. आंधारी फाटा (ता. जावळी) येथे ही घटना घडली.

 

आमदार शिंदे हे रविवारी सायंकाळी आमदार मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील महाबळेश्वर तालुक्यातील शेवटचं गाव असलेल्या रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी चालले होते. 

 

मात्र, कार्यक्रमाला जाण्यासाठी शिंदे यांना उशिर झाला होता. त्यामुळे शिंदे यांनी आपल्या वाहनचालकाला आपली फॉर्च्यूनर गाडी वेगाने चालविण्यास सांगितले. ज्या रस्त्यावरून शिंदे यांची गाडी चालली होती त्या रस्त्याचे काम नुकतेच झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर बारीक खडी पडलेली होती.

 

आंधारी फाट्याजवळ ही गाडी एका वळणावरून गेली असता खडीमुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. उशिर झाल्याने गाडी वेगात होती त्यामुळे ती सरळ दरीत कोसळणारच होती पण तेथे असलेल्या दोन झाडांमुळे गाडी अडकली. शिंदे व त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून तत्काळ उडी मारून आपले प्राण वाचवले व बाहेर रस्त्यावर येऊन थांबले. 

 

त्याचवेळी सातारा नगरपालिकेतील भाजपचे गटनेते धनंजय जांभळे यांची गाडी येत होती. त्याआधी काही मिनिटेच शिंदे यांची गाडी जांभळे यांना ओव्हरटेक करून पुढे गेली होती. त्यामुळे जांभळे यांना शिंदे यांचा घडलेला प्रसंग समजला. त्यांनी तत्काळ खाली उतरून शिंदे यांची विचारपूस केली व पुढे रामेघर येथे कार्यक्रमस्थळी सोडले. 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आहेत. अजित पवारांचे ते निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...