आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचा रूई गावात जलसंधारणाच्या कार्यास हातभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- पाणी फाऊंडेशनच्या कामात सहभागी असलेल्या रुई या गावामध्ये 'एक धाव पाण्यासाठी मिनी मॅरेथॉन' आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पाणी फाउंडेशन, रुई व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथील स्पर्धक सहभागी झाले होते. या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित राहून श्रमदान केले व रुई गावाला या कार्यासाठी धनादेश दिला.

 

यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, दोन वर्षांच्या अपयशानंतर निसर्गावर दोन हात करण्याची ताकद फक्त रुई गावच करू शकते. आम्ही फक्त निमित्तमात्र असतो, परंतु किमया करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे, अशा शब्दांत त्यांनी श्रमदान करणाऱ्यांचे कौतुक केले. या गावामध्ये पाण्यासाठी सातत्याने टँकर लागत होता, परंतु इथल्या ग्रामस्थांनी तळे बनवून ती समस्या दूर होण्यास मदत केली, याबाबतही शिंदे यांनी ग्रामस्थांचे प्रयत्न वाखाणले. 

 

जलयुक्त शिवारसाठी या भागाला कसे पात्र करता येईल हा प्रयत्न आ. शशिकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आला होता. आज त्यांनी वैयक्तिकरीत्या धनादेश देऊन या गावाला जलसंधारणाच्या कामात मदत केली. स्पर्धेमध्ये बक्षीस फक्त महत्वाचे नाही, आपण जी मेहनत करत आहे त्यामुळे या गावाचे भविष्य घडत आहे. या गावाला बक्षीस मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीवर मला संधी मिळाली, याचा उल्लेख करतानाच पाण्यासाठी ग्रामस्थ करत असलेल्या कार्याचे बक्षीस म्हणून रुई येथील शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले. येत्या एक-दोन वर्षांत या भागातही बागायत क्षेत्र निर्माण होईल, त्यादृष्टीने काम करूयात, असे आवाहन शिंदे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...