आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड: बिग सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये मनसेचा हंगामा, शहराध्यक्षसह कार्यकर्ते ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांची छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केले जाते. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्स नेण्यास परवानगी असतानाही सुरक्षेचे कारण पुढे करून ते नेऊ दिले जात नाही, याच्‍या निषेधार्थ चिंचवडमधील बिग सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये मनसे कार्यकर्त्‍यांनी आंदोलन केले. यावेळी बिगसिनेमाच्या बाहेरील फलक फाडण्यात आला. तसेच खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवरील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बिग सिनेमाच्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले. आंदोलनानंतर पिंपरी पोलिसांनी शहराध्यक्ष सचिन चिखलेसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


...अन्‍यथा मनसे स्‍टाईल आंदोलन
आंदोलनानंतर सचिन चिखले म्हणाले की, आज आम्ही शहरातील सर्वच चित्रपटगृहात जाऊन खाद्यपदार्थांची जादा दरातील विक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे. जर या मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर येत्या काळात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात राजू साळवे, हेमंत डांगे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, दत्ता घुले, रूपेश पटेकर, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संजय यादवसह इतर कार्यकत्र्यांनी सहभाग घेतला होता.


हायकोर्टाने राज्‍य सरकारला फटकारले
मल्टीप्लेक्समध्‍ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. तसेच मल्टीप्लेक्सच्या कारभारावर संतापही व्यक्त आहे. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी असेल तर मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांची विक्री का थांबवत नाही? असा सवाल करत खंडपीठाने थिएटर मालक तसेच राज्य सरकारला केला होता. एवढेच नव्हे तर अव्‍वाच्‍या सव्‍वा दराने विकले जाणारे हे पदार्थ सामान्य दरात विकले गेले पाहिजेत, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आंदोलनाचा व्हिडिओ... 

 

 

बातम्या आणखी आहेत...