आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सरसंघचालक मोहन भागवत 18 जानेवारीस पंढरपूर भेटीवर; संत, धर्माचार्यांशी साधणार संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत. - Divya Marathi
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत.


सोलापूर/पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे गुरूवारी (दि. 18)  पंढरपूर येथे येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध संप्रदायातील संत व धर्माचार्य यांच्याशी संवाद तसेच अनेक विधायक कामांची सुरूवात व्हावी या उद्देशाने या बैठकीला मोहन भागवत उपस्थित राहून संवाद साधणार आहेत.

 


या बैठकीस अनेक साधुसंत पंढरपूर येथे येणार आहेत. त्यापैकी संकेश्वर पीठ शंकराचार्य सागरानंद सरस्वती (त्र्यंबकेश्वर), काड सिद्धेश्वर महाराज (कोल्हापूर), शांतीब‘ह्म मारूतीबाबा - कुर्‍हेकर (आळंदी), भास्कर गिरी महाराज (नेवासे), चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर), प्रसाद महाराज अमलनेरकर (पंढरपूर), विद्वंस शामसुंदर शास्त्री (फलटण) आदी महनीय संत उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांबरोबरही मोहन भागवत संवाद साधणार आहेत. अशी माहिती धर्मचार्य संपर्क प्रमुख प्रफुल्ल जोशी यांनी दिली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...